Rajasthan News : राजस्थानात सापडले हजारो वर्षापूर्वीचे अवशेष; ‘पुरातत्त्व’चे संशोधन, सरस्वती नदीच्या काठी संस्कृती बहरल्याचा दावा
Cultural Heritage : राजस्थानमधील दीग जिल्ह्यात बहाज गावाजवळ साडेचार ते पाच हजार वर्षांपूर्वीची प्राचीन संस्कृती सापडली आहे. उत्खननातून सरस्वती नदीच्या खोऱ्याशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत.
दीग (राजस्थान) : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला राजस्थानमधील दीग जिल्ह्यातील बहाज गावात अंदाजे साडेचार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका अतिप्राचीन संस्कृतीचे पुरावे आढळले आहेत.