मंदिराजवळ घबाड सापडलं; खोदकामावेळी मिळाली ५०५ सोन्याची नाणी!

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

सापडलेल्या ५०५ नाण्यांमधील ५०४ नाणी लहान आकाराची असून, यात एक मोठ्या आकाराचे सोन्याचे नाणे आहे.

तिरुचिराप्पल्ली : येथील एका मंदिराजवळ खोदकाम करत असताना १.७१६ किलो वजनाची ५०५ सोन्याची नाणी सापडली आहेत. तिरुवनाईकावल येथील जांबुकेश्वर मंदिराजवळ बुधवारी (ता.२६) खोदकाम सुरू असताना एका पात्रात ही नाणी सापडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंदिर परिसरात सुरू असलेल्या खोदकामात सात फूट खोल जमिनीत ही नाणी आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की, सोन्याची नाणी व पात्र हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. ही नाणी पुढील तपासासाठी कोषागारात ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

- पहिली ते दहावी ‘मराठी अनिवार्य’च; विधेयक विधानसभेतही मंजूर!

कशी आहेत ही नाणी 

सापडलेल्या ५०५ नाण्यांमधील ५०४ नाणी लहान आकाराची असून, यात एक मोठ्या आकाराचे सोन्याचे नाणे आहे. यासर्व नाण्यांवर अरबी अक्षरे लिहिलेली आहेत. यावरील लिपीवरून ही नाणी इसवी सन १०००-१२०० चे असण्याची शक्यता मंदिराच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहेत.

- Video : ...अन् भर रस्त्यात ट्रक थांबवत लोक म्हणाले 'वन्स मोअर'; व्हिडिओ एकदा बघाच!

जमिनीच्या खाली 7 फूट एका तांब्याच्या भांड्यात ही नाणी सापडली, अशी माहिती मंदीर प्रशासनाने दिली.

- Video : 'कॅप्टन कूल' धोनी वळाला सेंद्रीय शेतीकडे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 505 Gold Coins found near Jambukeswarar temple in Tamil Nadu