
अनेकांनी आपल्या टू-व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्या रस्त्यातच थांबवल्या आणि वन्स मोअरची विनंती केली. हॉर्न ऐकून झाल्यावर रस्त्यावरील ट्रॅफिक जाम काही वेळानंतर पूर्वपदावर आले.
भोपाळ : कुणाला काय आवडेल याचा काही नेम नाही. आणि क्षणिक आनंदासाठी लोक काय करतील, हेही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हायरल व्हिडिओ सर्वांचं लक्ष्य वेधून घेत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अनेकांना आपली टू-व्हिलर, फोर व्हिलर तसेच मोठे ट्रक ही वाहने सजविण्याची हौस असते. तसेच अनेकजण आपल्या वाहनाला हटके हॉर्नही बसवून घेतात. कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न आपण आतापर्यंत पाहिले आहेत. मात्र, भोपाळमधील एका ट्रक ड्रायव्हरने आपल्या ट्रकला बसविलेला हॉर्न सध्या सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
They are on another level, any way horn was awesome
— The outsider (@outsiderthe9) February 26, 2020
- 'बाहुबली' प्रभासच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी...
सोशल मीडियावर चलती असलेल्या या मालवाहू ट्रकचा हॉर्न चर्चेचा विषय ठरत आहे. भोपाळमध्ये नागरिकांनी आपल्या गाड्या भररस्त्यात थांबवत हा ट्रक अडवला. आणि या ट्रकच्या ड्रायव्हरला हॉर्न वाजविण्याची विनंती केली. आता या हॉर्नमध्ये एवढं काय विशेष असा प्रश्न अनेकांना पडला असेल? पण बॉलिवूड चित्रपटाच्या एका गाण्याची चाल या हॉर्नला असल्याने अनेकांचं तो मनोरंजन करत आहे. या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
It happens only in India
— Zeeshan Siddiqui (@siddzeeshn) February 26, 2020
- 10 वर्ष संसार करून बॉलीवुडची 'ही' जोडी घेतेय घटस्फोट
अनेकांनी आपल्या टू-व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्या रस्त्यातच थांबवल्या आणि वन्स मोअरची विनंती केली. हॉर्न ऐकून झाल्यावर रस्त्यावरील ट्रॅफिक जाम काही वेळानंतर पूर्वपदावर आले. लग्नात डीजे वाजविण्यापेक्षा या ड्रायव्हरला बोलवा, या व्हिडिओमुळे आजच्या दिवसाची चांगली सुरवात झाली, हे फक्त भारतातच घडू शकतं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे.
crazy people stopped this truck just to listen the horn pic.twitter.com/syF8fLKT07
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 25, 2020
- बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान करतोय त्याच्या आगामी सिनेमाची जोरदार तयारी..
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रतिज्ञा' या चित्रपटातील गाण्याची धून या हॉर्नला आहे. 'मैं जट यमला पगला दिवाना' हे गाणं आजही अनेकांच्या ओठी आहे. 2011 मध्ये आलेल्या 'यमला पगला दिवाना' या चित्रपटासाठी या गाण्याचं रिमेक करण्यात आलं होतं.
This is so called enjoying like anything. https://t.co/gXlZonznVD
— Chandra Kishore (@Chandra24041322) February 26, 2020