आपण 52 जणच भाजपसाठी पुरेसे आहोत : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

सोनियांकडून राहुल गांधींचे कौतुक
सोनिया गांधी यांनी राहुल गांधींचे कौतुक करत म्हटले आहे, की राहुल हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी आक्रमक लढाई लढली. काँग्रेसच्या गटनेत्याची निवड लवकरच करण्यात येईल.

नवी दिल्ली : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फक्त 52 जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही भाजपशी रोज ताकदीने लढू, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. सोनिया गांधी यांची आज (शनिवार) काँग्रेसकडून संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले.

राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसच्या प्रत्येक खासदाराला लक्षात ठेवावे लागेल की त्यांना संविधान वाचवावे लागेल. भारतातील प्रत्येक नागरिकाची लढाई आपल्याला लढायची आहे. त्या नागरिकाचा रंग कोणताही असो. आपले 52 खासदार असले तरी काय झाले, आपल्याला भाजपविरोधात इंच-इंचाची लढाई लढावी लागणार आहे. आपण 52 जणच भाजपसाठी पुरेसे आहोत. भाजप आपल्याविरोधात द्वेषाचे राजकारण करेल, पण आपल्याला त्यांना प्रेमानेच उत्तर द्यायचे आहे.

सोनियांकडून राहुल गांधींचे कौतुक
सोनिया गांधी यांनी राहुल गांधींचे कौतुक करत म्हटले आहे, की राहुल हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी आक्रमक लढाई लढली. काँग्रेसच्या गटनेत्याची निवड लवकरच करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 Congress Lok Sabha MPs enough to make BJP jump everyday, says Rahul Gandhi