esakal | धक्कादायक! शाळेच्या हॉस्टेलमध्ये करोनाचा कहर, ५४ विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

corona}

आरोग्य विभागाचं एक पथक या हॉस्टेलमध्ये दाखलं झालं असून याला कन्टेमेंट झोन घोषीत केलं आहे.

धक्कादायक! शाळेच्या हॉस्टेलमध्ये करोनाचा कहर, ५४ विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

हरयाणातील करनाल जिल्ह्यातील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये करोनाच्या संसर्गानं थैमान घातलं असून तब्बल ५४ विद्यार्थ्यी करोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचं एक पथक या हॉस्टेलमध्ये दाखलं झालं असून याला कन्टेमेंट झोन घोषीत केलं आहे. करनालचे आरोग्य अधिकारी योगेश कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.  

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे विद्यार्थी कुंजपुरा येथील सैनिक शाळेतील विद्यार्थी आहेत. या शाळेत हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली आहे. या शाळेतून मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने ही शाळा सॅनिटाइज केली असून या शाळेतील शिक्षकांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. 

तांदूळ शिजवून खाण्याची गरजच नाही!; तेलंगणातील शेतकऱ्याचा महत्वूपूर्ण शोध

 दरम्यान, कालच कुंजपुरा येथे तीन विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर 2,20,538 संशयीतांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यांपैकी 2,06,924 जणांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे.