ओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

57 year old odisha tribal mla Angad Kanhar appears for matric exam 4 decades after dropping out
ओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा...

ओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा...

भुवनेश्वर : ओडिशात शालेय जीवनात महत्वाची समजल्या जाणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. राज्यभरातील जवळपास सहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. विधानसभा निवडणुकीची राजकीय ‘परीक्षा’ उत्तीर्ण झाल्यावर बिजू जनता दलाचे फुलबनी मतदारसंघाचे आमदार अंगद कान्हर हेही दहावीची परीक्षा देत आहेत. कंधमाल जिल्ह्यातील पिताबरी गावातील रुजंगी हायस्कूलमध्ये त्यांनी शुक्रवारी दुसरा पेपर दिला. कान्हर यांनी १९७८ मध्येच शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले हाते, अशी माहिती त्यांच्या नजीकच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यानंतर, हे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली.

त्यांनी २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर आठवीची परीक्षा दिली. दरम्यान, आमदार म्हणून कान्हार यांना कोणतही विशेष वागणूक दिली जात नसल्याची माहिती परीक्षाकेंद्राच्या अधीक्षक अर्चना बासा यांनी दिली. ते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देत आहेत. परीक्षेपूर्वी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. ओडिशात दहावीच्या परीक्षेसाठी यंदा पाच लाख ८५ हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यभरातील ३,५४० परीक्षा केंद्रावरून विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्याचप्रमाणे, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी ३५ हजार शिक्षक काम करत आहेत.

काही पंचायत सदस्य आणि माझ्या चालकाने दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. मी परीक्षेत उत्तीर्ण होईल की अनुतीर्ण हे मला माहित नाही. मात्र, दहावीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या इच्छेने मी ही परीक्षा देत आहे.

-अंगद कान्हर, आमदार, ओडिशा

Web Title: 57 Year Old Odisha Tribal Mla Angad Kanhar Appears For Matric Exam 4 Decades After Dropping Out

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top