
नवी दिल्ली : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातानंतर एअरबॅग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानुसार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार निर्मात्या कंपन्यांना काही महत्वाचे सवाल केले आहेत. त्यांनी म्हटलं की, एकाच कंपनीच्या निर्यात होणाऱ्या कार्सना ६ एअरबॅग्ज तर देशांतर्गत कार्सना ४ एअरबॅग्ज असं का? कंपन्यांसाठी गरिबांचे प्राण वाचवणं महत्वाचं नाही का? (6 airbags in exported vehicles why just 4 in Indian units Nitin Gadkari questions car makers)
इंडिया टुडेशी बोलताना गडकरी यांनी हे सवाल केले आहेत. त्यांनी म्हटलं की, इकॉनॉमी कारच्या निर्मात्यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे एअरबॅगची संख्या वाढल्यानं वाहनांच्या किंमतीवर लक्षणीय परिणाम होईल. कारमधील एका एअरबॅगची किंमत 900 रुपयांपर्यंत कमी असू शकते. दरम्यान, कार्समध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची प्रक्रिया आधीच सुरू असल्याचंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.
सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूवर भाष्य
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावर बोलताना गडकरी म्हणाले, अहमदाबाद-मुंबई हायवेवरील ट्राफिकचं प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळं हा हायवे खूपच धोकादायक बनला आहे. ज्यावेळी मी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो तेव्हा मीच हा हायवे बांधला होता, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.
भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्यांचं नेटवर्क
रस्ते अपघातांबाबत बोलताना गडकरी म्हणाले, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्यांचं नेटवर्क असूनही अजून बरंच काम करायचं आहे. “दरवर्षी भारतात 5 लाख अपघात होतात आणि 1,50,000 रस्ते अपघातात मृत्यू होतात. यापैकी ६५ टक्के मृत्यू हे १८ ते ३४ वयोगटातील लोकांचे आहेत. सन 2024 च्या अखेरीस देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने कमी करण्याची आपली इच्छा आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने काम सुरू झालं असून रस्ते सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय प्रणालींचं पालन करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. "जीवन वाचवणं महत्वाचं आहे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.