सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना एकाचवेळी 'स्वाईन फ्लू'ची लागण

वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना एकाच वेळी एच १ एन १ (स्वाईन फ्लू) विषाणूची लागण झाली आहे. यामुळे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी तातडीने बैठक घेऊन वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून या संसर्गापासून त्यांचा बचाव करावा, असे निर्देश दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या बैठकीबद्दल वकिलांना माहिती दिली. एच १ एन १ (स्वाईन फ्लू) च्या प्रसाराचा आढावा घेण्यासाठी सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बैठक होऊन वकिलांसाठी रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

सरन्यायाधीश बोबडे यांनीही नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत चर्चा केली. या बैठकांमुळे सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे कामकाज नियमित वेळेनुसार म्हणजे साडेदहाऐवजी ११ वाजून आठ मिनिटांनी सुरू झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 Top Court Judges Catch Swine Flu