कोरोनाच्या आकड्यांचे रेकॉर्ड ब्रेक; जगातील सर्वाधिक नवे रुग्ण भारतात

64399 Covid Cases In India In Biggest 1 Day Spike Total Over 2150000
64399 Covid Cases In India In Biggest 1 Day Spike Total Over 2150000

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे सर्व आकडे काल (ता. ०८) एका दिवसात मोडीत निघाले आहेत. २४ तासात भारतात जगातील सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल भारतात ६४ हजार ३९९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून देशात ८६१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१ लाख ५३ हजार १० वर पोहोचली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारतात आतापर्यंत एकूण १४ लाख ८० हजार ८८४ कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ४३ हजार ३७९ झाली आहे. भारतातील पॉजिटिविटी रेट आता ८.९५ टक्के एवढा झाला आहे. काल भारतात आतापर्यंतच्या सर्वाधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल एका दिवसात भारतात ७ लाख १९ हजार ३६४ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण २ कोटी ४१ लाख ६ हजार ५३५ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

भारतात रुग्णांची संख्या २१ लाखांवर पोहोचण्यासाठी एकूण १९२ दिवसांचा कालावधी लागला आहे. सुरुवातीला एक लाख रुग्ण होण्यासाठी ११० दिवसांचा कालावधी लागला होता. परंतु, त्यानंतर ८२ दिवसांत २० लाखाहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अडचणीची गोष्ट म्हणजे एका दिवसात नवे रुग्ण मिळण्याची संख्या आता ६० हजारांच्या वर गेली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे आकडेही वाढत असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com