‘ज्ञानवापी’चे ६५ टक्के सर्वेक्षण पूर्ण

सलग दुसऱ्या शांततेत दिवशी ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात आले
Gyanvapi masjid
Gyanvapi masjidSakal

वाराणसी - न्यायालयाच्या आदेशानुसार आज सलग दुसऱ्या शांततेत दिवशी ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. काल या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती. ते उद्याही (ता. १६) सुरू राहील. मशीद समितीच्या आक्षेपामुळे गेल्या आठवड्यात सर्वेक्षण रखडले होते. न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांना मशिदीच्या आवारात व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा आक्षेप मशीद समितीने घेतला होता.

प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरच्या भिंतीवर मूर्ती असून या मूर्तींसमोर प्रार्थना करू देण्याची मागणी करत काही महिला भाविकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने सर्वेक्षण सुरूच ठेवण्याचे आदेश दिल्यावर मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळत व्हिडिओ सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार, हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com