65 वर्षांच्या महिलेने 13 महिन्यांत दिला आठ मुलांना जन्म?

वृत्तसंस्था
Friday, 21 August 2020

एका 65 वर्षांच्या महिलेने 13 महिन्यांत आठ मुलांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण, प्रत्यक्षात असे काही नसून एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. मुजफ्फरपूर येथे घोटाळ्याची घटना उघडकीस आली आहे.

पाटणा (बिहार): एका 65 वर्षांच्या महिलेने 13 महिन्यांत आठ मुलांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण, प्रत्यक्षात असे काही नसून एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. मुजफ्फरपूर येथे घोटाळ्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांना म्हणाला; मी कोण आहे दाखवतोच...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुशहरी प्रखंड तालुक्यातील गावात राहणाऱया एका 65 वर्षांच्या शांती देवी नावाच्या महिलेने 13 महिन्यांत 8 मुलांना जन्म दिल्याची नोंद झाली. पण प्रत्यक्षात असे काहीच घडलेले नाही. शिवाय, गेल्या 20 वर्षांत शांती देवी यांनी मुलांना जन्म दिलेलाच नाही. पण, ही नोंद त्यांच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरून झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला अपत्य जन्मानंतर 1400 रुपये इतकी रक्कम मिळते. त्यानुसार शांती देवी यांच्या खात्यात 13 महिन्यात एक दोन नव्हे तर आठ वेळा ही रक्कम जमा झाली आहे. पण, शांती देवी यांना मात्र याबाबतची कोणतीही माहिती नव्हती.

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

लीला देवी नावाच्या महिलेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. कहर म्हणजे त्यांनी एकाच दिवशी दोन मुलांना जन्म दिल्याची नोंद आहे. त्यांच्याही खात्यात रक्कम आली होती. पण, त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला आणि घोटाळा उघड झाला. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, दोघींच्या नावावर रक्कम जमा करण्यात आली आणि दुसऱयाच दिवशी काढून घेण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे राष्ट्रीय आरोग्य योजनेत मोठा घोटाळा होत आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 years old woman given birth 8 children 13 months scam national health mission

Tags
टॉपिकस
Topic Tags: