शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

वृत्तसंस्था
Thursday, 20 August 2020

डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता. तब्बल सात तासांनी मृतदेह उठून बसल्याचे कर्मचाऱयाने पाहिले आणि कर्मचारी ओरडत शवगृहाबाहेर पळत सुटला. पण, संबंधित व्यक्ती जीवंत असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना आनंद झाला.

मॉस्को (रशिया): डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता. तब्बल सात तासांनी मृतदेह उठून बसल्याचे कर्मचाऱयाने पाहिले आणि कर्मचारी ओरडत शवगृहाबाहेर पळत सुटला. पण, संबंधित व्यक्ती जीवंत असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना आनंद झाला.

डॉक्टरने युवतीच्या हत्येचा खुलासा व्हिडिओमधून केला...

चित्रपटांमध्ये असे दृष्य अनेकदा पाहायला मिळते. पण, असा एक प्रसंग रशियत घडला असून, चर्चांना उधान आले आहे. एक 81 वर्षांची आजी मृत घोषित केल्यानंतर तब्बल सात तासानंतर जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. झिनिडा कोनोकोव्हाची (वय 81) असे आजींचे नाव आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे पार्थिव शवगृहात ठेवण्यात आले. पण, दुसऱया दिवशी आठ वाजता म्हणजे सात तासांनी आजी उठून बसल्या होत्या. शवगृहात काम करणारी एक कर्मचारी घाबरून जोर-जोरात ओरडू लागला आणि पळत बाहेर आला.

शाळा-महाविद्यालये सुरू होताच कोरोनाचा विस्फोट...

महिला कर्मचाऱयाने पाहिले की, कोनोकोव्हाची उठून बसल्या होत्या. शिवाय, त्या पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. कोनोकोव्हा यांनी पळण्यास सुरुवात केल्यानंतर इतर महिला कर्मचाऱयांनी त्यांना पकडले आणि शरिरावर ब्लॅंकेट टाकले. त्यानंतर त्यांना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की, 'आमच्यासाठी हे अविश्वसनीय आहे. कोनोकोव्हा यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यानंतर त्यांचा श्वासोश्वास बंद पडला होता. ऑक्सिजन लावल्यानंतरही काहीही हालचाल झाली नाही. त्यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले होते.' दरम्यान, कोनोकोव्हा जिवंत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking news old woman comes back to life after doctor announce her dead