भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात ७ आरोपींना फाशीची शिक्षा! - Bhopal-Ujjain passenger train bombing case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhopal-Ujjain passenger train bombing case

भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात ७ आरोपींना फाशीची शिक्षा!

भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात ८ पैकी सात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज विशेष एनआयए न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तर आणखी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद फैसल, गौस मोहम्मद, अझहर, आतिफ मुझफ्फर, दानिश, मीर हुसैन आणि आसिफ इक्बाल यांना फाशीची शिक्षा सुनावली. आतिफ इराकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

७ मार्च २०१७ रोजी मध्य प्रदेशातील शाजापूरजवळ जाबरी रेल्वे स्थानकावर सकाळी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते.

आधी एटीएसने या प्रकरणाचा तपास केला होता. एटीएसच्या तपासादरम्यान लखनऊमध्ये झालेल्या चकमकीत सैफुल्ला नावाचा दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. एनआयएने लखनऊ NIA कोर्टात आरोपपत्र सादर केले.

एनआयएच्या तपासात मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला होता. नंतर एनआयएने आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे, स्फोटके आणि शस्त्रे गोळा करणे, असे आरोप करण्यात आले होते.

टॅग्स :bhopal