Accident News: अयोध्येत भीषण रस्ता अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 7 ठार, 40 हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रात्री उशिरा लखनौ-गोरखपूर महामार्गावर भीषण अपघात झाला
Accident News
Accident NewsEsakal

अयोध्येमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक उलटून बसच्या वर पडला. त्यामुळे बसचा पुरता चक्काचूर झाला.

या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तर ट्रक बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये लखनऊ-गोरखपूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Accident News
Karnataka Elections : कर्नाटकसाठी राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटा होऊन बसच्या वर पडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Accident News
SAKAL Exclusive : महावितरणकडून गेल्या वर्षात पावणेदोन लाख कृषिपंपांना जोडणी; 10 वर्षांतील उच्चांक!

या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. बस आणि ट्रकखाली अनेक जण अडकले. क्रेनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. अनेकांचा जागीच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात गेल्यानंतर मृत्यू झाला. त्याचबरोबर जखमींना विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. बचावकार्यासाठी एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती.

Accident News
Indapur: छत्रपती कारखान्यात धुरळा उडणार! तीन वर्ष लांबलेली निवडणूक होणार; न्यायलयाचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस लखनौहून येत होती. ती वळणार असतानाच गोरखपूरहून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. ट्रकचा वेग खूप होता. बसमध्ये सुमारे 40 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com