Karnataka Elections : कर्नाटकसाठी राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

निपाणीतून उत्तम पाटील रिंगणात
LIVE Update
LIVE UpdateEsakal

कर्नाटकात राष्ट्रवादी कर्नाटकमधील निवडणूक लढवणार असून पक्षाकडून नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे घड्याळ या चिन्हावर कर्नाटकमधील निवडणूक पक्षाला लढता यावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पुन्हा आता घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असून कर्नाटकात पहिल्या यादीत नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे.

LIVE Update
मोठी बातमी! शनिवारी, रविवारी पण विद्यार्थ्यांचे तास; मेमध्ये विद्यापीठांची अंतिम सत्र परीक्षा

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपला पहिला उमेदवार जाहीर केला असून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तम पाटील हे काँग्रेसमधून इच्छुक होते. पण काँग्रेसकडून त्या ठिकाणी काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता उत्तम पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने या मतदारसंघातून शशिकला ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली आहे.

LIVE Update
Joe Biden : बायडेन लवकरच रिंगणात उतणार; ट्रम्प यांच्याशी सामना शक्य

कर्नाटकातील राष्ट्रवादीचे पहिल्या यादीतील नऊ उमेदवार

निपाणी - उत्तम पाटील

हिप्परगी - मन्सुर साहेब बिलगी

बसवान बागेवाडी - जमिर अहमद इनामदार

नाग्थन - कलाप्पा चव्हाण

येलबर्गा - हरी आर

रानेबेन्नूर - आर शंकर

हग्री बोम्मनहल्ली - सुगुना के

विरापेट - मन्सुद फौजदार

नरसिम्हाराजा - श्रीमती रेहाना बानो

LIVE Update
Ola Uber Rickshaw : ओला, उबेर रिक्षा वाहतूक बंदीने पुणेकरांची ‘वाट’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com