आस्मानी संकट! आसाममध्ये 7 लाख बाधित तर, बिहारमध्ये 33 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

आस्मानी संकट! आसाममध्ये 7 लाख बाधित तर, बिहारमध्ये 33 जणांचा मृत्यू

पटना : बिहारमध्ये (Bihar) शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून (Lighting) 16 जिल्ह्यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. बिहारमधील या आस्मानी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Modi) खेद व्यक्त करत मदतीचे आश्वासन दिले आहे. (Asam Bihar Rain News)

तर, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि भूस्खलनामुळे आसामच्या अनेक (Asam) भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताज्या घटनांनुसार नागाव, होजई, कचार आणि दररंग या चार जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. येथे पूर आणि भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली असून, या भयानक पूर (Flood) स्थितीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमधील सुमारे 7.12 लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर, दुसरीकडे कर्नाटकातही या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर आला आहे.

सूचनांचे पालन करा

दरम्यान, वीज पडून झालेल्या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्वीट करत नागरिकांना सावध राहण्याचे “घरी रहा आणि सुरक्षित रहा,” असे म्हणत त्यांनी नाहरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचीबद्ध केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.

हेही वाचा: 'नग्न' अवस्थेतील युक्रेनियन महिलेच्या आक्रोशानं हादरली 'कान्स नगरी'

आसाममध्ये परिस्थिती गंभीर

गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपण विस्कळीत झाले असून, नागाव जिल्ह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. कछार जिल्ह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दारंग जिल्ह्यात 52,709 लोक प्रभावित झाले आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. तर, दिमा हसाव जिल्ह्यातदेखील पुरामुळे हाहाकार उडाला असून, ठिकठिकाणी पाणी साठल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचे पाणीही अनेक घरांमध्ये घुसल्याने लोकांना जगणे अशक्य झाले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार पुराच्या पाण्यामुळे येथील 80,036.90 हेक्टर पीक जमीन आणि 2,251 गावे अजूनही पाण्याखाली असून, एकूण 74,705 पूरग्रस्त लोकांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या 234 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे

Web Title: 7 Lakh Affected In Assam 33 Killed In Bihar Amid Rain Fury

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top