जगातील 70 टक्के वाघ भारतात 

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जुलै 2020

2014 च्या तुलनेत 2018 मध्ये देशांतील वाघांची संख्या 33 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत देशभरातील जंगलांमध्ये कॅमेऱ्यांचा वापर करून वाघांची छायाचित्रे घेण्यात आली होती.

नवी दिल्ली -  जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी दिली. जागतिक व्याघ्र दिनाच्या (ता. 29) पार्श्‍वभूमीवर पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी 2018 मधील भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला. याची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 2014 च्या तुलनेत 2018 मध्ये देशांतील वाघांची संख्या 33 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत देशभरातील जंगलांमध्ये कॅमेऱ्यांचा वापर करून वाघांची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यात वाघांची छायाचित्रे 76 हजार 651 होती, तर बिबट्यांची 51 हजार 777 एवढी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी झाली व्याघ्र गणना 

व्याघ्र गणनेचे क्षेत्र (वीस राज्ये) -  3 लाख 81 हजार 400 चौरसमीटर 
कॅमेरा लावलेले क्षेत्र  -  1 लाख 21 हजार 337 चौरसमीटर 
लावलेले कॅमेरे  -  26 हजार 838 
पायी केलेले सर्वेक्षण  -  5 लाख 22 हजार 997 किलोमीटर 
विशिष्ट ठिकाणी झालेले सर्वेक्षण  -  3 लाख 17 हजार 958 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

2018 मधील वाघांची संख्या 
राज्य 
बिहार -31 
उत्तराखंड -442 
उत्तर प्रदेश- 173 
आंध्र प्रदेश- 48 
तेलंगण- 26 
छत्तीसगड-19 
झारखंड-5 
मध्य प्रदेश- 526 
महाराष्ट्र-312 
ओडिशा- 28 
राज्यस्थान-69 
गोवा- 3 
कर्नाटक -524 
केरळ-190 
तमिळनाडू-264 
अरुणाचल प्रदेश- 29 
आसाम- 190 

भूप्रदेश 
1) शिवालिक पर्वत रांगा आणि गंगेचे खोरे- 646 
2) मध्य भारत आणि पूर्वेकडील घाट- 1033 
3) पश्‍चिम घाट- 981 
4) ईशान्येकडील टेकड्या आणि ब्रह्मपूत्रेचे खोरे- 219 
5) सुंदरबन- 88 

वाघ्रगणना अंदाजे 
2006- 1411 
2010-1706 
2014-2226 
2018-2967


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 per cent of the worlds tigers in India