बंगळूर विमानतळावर सुटकेसमध्ये आढळली अजगर, साप, माकडांची तब्बल 70 पिल्लं; थायलंडहून आलेल्या वन्यजीव तस्कराचा पर्दाफाश

सुटकेसमध्ये अत्यंत विषारी अशा किंगकोब्राची (नागराज) २० पिल्ले आणि अजगर तसेच इतर सापाची ५० हून पिल्ले आढळून आली.
Bangalore Airport
Bangalore Airportesakal

बंगळूर : बंगळूर विमानतळावर (Bangalore Airport) बुधवारी रात्री बँकॉकहून (Bangkok) आलेल्या तामिळनाडूतील व्यक्तीच्या सुटकेसमध्ये किंगकोब्राची (King Cobra) वीस, अजगरासह ५० पिल्ले आणि इतर साप आढळून आले. हा वन्यजीव तस्कर सुटकेसमध्ये सहा माकडांची पिल्लेही घेऊन जात होता.

बंगळूरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (केआयए) सूत्रांनी सांगितले की, थायलंडहून आलेल्या वन्यजीव तस्कराचा बंगळूर कस्टम्सच्या गुप्तचरांनी पर्दाफाश केला. संशयास्पद रीतीने वागणाऱ्या प्रवाशाला अडवण्यात आले आणि त्याच्या सामानाचे स्कॅनिंग केल्यानंतर तपास करणाऱ्यांना धक्काच बसला.

Bangalore Airport
'मी महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालोय, त्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ'; कोणी दिलाय सतेज पाटलांना इशारा?

त्याच्या सुटकेसमध्ये अत्यंत विषारी अशा किंगकोब्राची (नागराज) २० पिल्ले आणि अजगर तसेच इतर सापाची ५० हून पिल्ले आढळून आली. हे सर्व सरपटणारे प्राणी बॉक्समध्ये पॅक केले होते. त्याच्या चेक-इन सूटकेसमध्ये ही तस्करी करण्यात येत होती, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हा तस्कर सहा माकडांचीही तस्करी करत होता. त्या प्रयत्नात त्यांचा जीव गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Bangalore Airport
Kolhapur : महाडिक गटाला मोठा दणका; राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र, शौमिका महाडिकांसह कुटुंबातील दहा जणांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com