धुक्यामुळे उत्तर रेल्वेच्या 70 गाड्या उशिरा; 7 रद्द

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली- उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला असताना गुरुवारी सकाळी दाट धुके पडल्यामुळे किमान 70 रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत, तर इतर सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

संपुर्णा क्रांती एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा तब्बल 26 तास उशिरा धावत आहे. तसेच, भागलपूर-आनंद विहार गरीब रथ आणि भागलपूर-नवी दिल्ली विक्रमशीला एक्सप्रेस 23 तासांनी उशिरा धावत आहे. तर वैशाली एक्सप्रेसला 25 तासांचा विलंब झाला आहे. याशिवाय 22 रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, असे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांमध्ये दिल्ली-मालडा टाऊन फराक्का एक्सप्रेस, नवी दिल्ली-पुरी एक्सप्रेस, फिरोजपूर कँट-दिल्ली सराई रोहिला इंटरसिटी एक्सप्रेस, नवी दिल्ली-राजेंद्र नगर संपुर्णा क्रांती एक्सप्रेस, नवी दिल्ली-मंडुआदी सुपरफास्ट एक्सप्रेस, हबीबगंज शताब्दी आणि लखनौ स्वर्ण शताब्दी यांचा समावेश आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 Trains Delayed, 7 Cancelled due to Dense Fog