

70 Year Old Man Cycles 600 Km For His Wifes Treatment
Esakal
ओडिशातील संबलपूर इथल्या एका ७० वर्षीय बाबू लोहार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. वृद्ध आणि आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७० वर्षीय बाबू लोहार हे तिला सायकल रिक्षाने तब्बल ३०० किमी दूर असलेल्या रुग्णालयात घेऊन गेलेत. आजारी पत्नीला रुग्णालयात रुग्णवाहिकेनं नेण्यासाठी पैसे नसल्यानं बाबू लोहार यांनी रिक्षालाच अॅम्ब्युलन्स बनवलं. कडाक्याच्या थंडीत ३०० किमी अंतर पार करत ते रुग्णालयात पोहोचले. उपचारानंतर पुन्हा सायकल रिक्षानेच घरी परतले.