तिने आजोबांना केला स्पर्श अन् तिथेच फसले...

वृत्तसंस्था
Monday, 2 March 2020

एका 35 वर्षीय महिलेने 70 वर्षांच्या आजोबांच्या गालाला हात लावला आणि तिथेच फसले. महिलेने आजोबांसोबत विवाह केल्यानंतर पैसे घेऊन पळ काढला. पोलिसांनी तिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका 35 वर्षीय महिलेने 70 वर्षांच्या आजोबांच्या स्पर्श केला आणि तिथेच फसले. महिलेने आजोबांसोबत विवाह केल्यानंतर पैसे घेऊन पळ काढला. पोलिसांनी तिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

लग्न मंडपात प्रियकराने लगावली नवरीच्या कानशिलात...

शहरामध्ये एक वृद्ध दांपत्य राहात आहे. त्यांची काळजी (केअरटेकर) घेण्यासाठी एक महिला होती. महिलेने आजोबांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी विवाह केला. तिने आजोबांच्या पहिल्या पत्नीकडे पैशांची मागणी केली. परंतु, त्यांन पैसे देण्यास नकार दिला. तिने काही दिवसांनी आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अंत्यसंस्कारासाठी 50 हजार रुपये व सोने घेऊन गेली. दशक्रियानंतर येते म्हणून सांगितले होते. 13 दिवस झाल्यानंतरही आली नाही म्हणून तिला संपर्क केला असता. थोड्या दिवसात येते म्हणून सांगितले. पण, पुढे तिने फोन घेणेही बंद केले.

प्रेयसीचे वडील आणि भाऊ अचानक आला अन्...

वृद्धाने आपली फसणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिच्यासह साथीदाराला अटक केली. पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

मी, पत्नीवर खूप प्रेम करीत होतो पण...

पोलिसांनी सांगितले की, 'संबंधित महिला वृद्धांना लक्ष बनवून त्यांना लुटण्याचे काम करत होती. वृद्धांसोबत विवाह केल्यानंतर संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी पाठीमागे लागायची. किंवा घरामधील सोने, पैसे घेऊन पळ काढायची. तिने अशा प्रकारे अन्य कोणाला फसवले आहे, याबाबतची माहिती घेत आहोत.'

वृद्ध प्रेमी युगलाला एकांतात पकडले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 year old person trapped in 35 year old brides love at bhopal