71 Wanted Indian Fugitives Living Abroad
esakal
A government report reveals that 71 wanted Indian fugitives are currently abroad : भारताला हवे असलेले सत्तरपेक्षा जास्त फरार आरोपी परदेशात असल्याची माहिती पुढे आली आहे. तर इतर देशांना हवे असलेले तब्बल २०३ फरार आरोपी भारतात शोधून काढण्यात आले आहेत. केंद्र सरकराने एक अहवाल सादर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना देखील उधाण आलं आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन मंत्रालयाच्या २०२४-२५ च्या वार्षिक अहवालानुसार, भारताला हवे असलेले एकूण ७१ फरार आरोपी २०२४-२५ मध्ये परदेशात आढळून आले. अधिकृत सूत्रांच्या मते, गेल्या दहा वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. मागील आर्थिक वर्षात परदेशातून २७ फरार आरोपी भारतात परत आणण्यात यश आल्याची माहिती अहवालात दिली आहे.