717046 people across 29 districts affected 9 die in assam floods
717046 people across 29 districts affected 9 die in assam floods

आसामच्या पुरात 9 जणांचा मृत्यू, तर 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित

गुवाहटी : आसाममध्ये मॉन्सुनपूर्व पावसाने थैमान घातले असून संपूर्ण राज्याला मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा लाखो लोकांना फटका बसला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 29 जिल्ह्यांतील 7,17,046 लोक लोक पूरस्थितीमुळे बाधित झाले आहेत. तर राज्यात आलेला पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, नागाव जिल्ह्यात सुमारे 2.88 लाख लोक बाधित झाले आहेत, त्यानंतर कचरमध्ये 1.19, होजईमध्ये 1.07 लाख, दारंगमध्ये 60562, बिस्वनाथमध्ये 27282 आणि उदलगुरी जिल्ह्यात 19755 लोक बाधित झाले आहेत. आसाममधील पूरस्थिती बुधवारी आणखीनच बिघडली असून आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

48,000 हून अधिक लोकांनी आसामच्या विविध जिल्ह्यांतील 135 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, तर पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी राज्यभरात 113 वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे आसाममधील बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्हा आणि त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या शेजारील राज्यांचा रेल्वे आणि रस्ते संपर्क विस्कळीत झाला आहे. बाधित लोकांच्या मदतीसाठी हवाई दलाने दिमा हासाओ येथे आवश्यक साहित्य सोडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com