बिहारमधील 72 टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल; मुख्यमंत्री, उपख्यमंत्र्यांविरोधातही गुन्हे

Bihar Ministers
Bihar Ministers
Updated on

नवी दिल्ली : बिहारमधील नव्याने स्थापन झालेल्या 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, असे निवडणूक अधिकार मंडळ ADR ने म्हटले आहे. या शिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. (Bihar Ministers news in Marathi)

Bihar Ministers
'रेवडी‘ची व्याख्या ठरवा, आम्ही तसा निर्णय करू; सुप्रीम कोर्टाची सूचना

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीसोबत हातमिळवणी करणाऱ्या नितीश कुमार यांनी मंगळवारी 31 नवीन मंत्र्यांचा समावेश करून आपल्या नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी 10 ऑगस्ट रोजी शपथ घेतली होती.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि बिहार इलेक्शन वॉचने 2020 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या मुख्यमंत्र्यांसह 33 पैकी 32 मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.

Bihar Ministers
भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राला स्थान नाही, नितीन गडकरीही बाहेर

एक कॅबिनेट मंत्री आणि JD(U) चे अशोक चौधरी, जे विधान परिषदेचे नामनिर्देशित सदस्य आहेत, त्यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाहीत. त्यामुले त्यांची गुन्हेगारी, आर्थिक आणि इतर तपशीलांची, ADR मध्ये उपलब्ध नाही असं अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, 23 मंत्र्यांनी (72 टक्के) फौजदारी खटले दाखल असल्याचं घोषित केलं आहे. तर 17 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com