Independence Day : 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न शक्य- मोदी

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

कलम 370 चांगलं होतं तर मग ते कायमस्वरुपी टिकावं म्हणून का प्रयत्न केले नाहीत असा प्रश्न प्रंतप्रधान मोदींनी केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमीत्त कलम 370 रद्द केल्यानंर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याच्याकडे पूर्ण भारताचे लक्ष आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न शक्य असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यदिन
नवी दिल्ली : कलम 370 चांगलं होतं तर मग ते कायमस्वरुपी टिकावं म्हणून का प्रयत्न केले नाहीत असा प्रश्न प्रंतप्रधान मोदींनी केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमीत्त कलम 370 रद्द केल्यानंर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याच्याकडे पूर्ण भारताचे लक्ष आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न शक्य असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

70 वर्षांमध्ये अर्थव्यवस्था 02 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली; मात्र त्यानंतर अवघ्या 05 वर्षांत अर्थव्यवस्था 01 ट्रिलियन डॉलरनं वाढली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. लोकांच्या आयुष्यातील सरकारची ढवळाढवळ टाळण्यासाठी अनेक कायदे रद्द केले पण वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असून त्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.
 

गेल्या ७० वर्षांमध्ये जे झालं नाही, ते ७० दिवसांमध्ये करुन दाखवलं असून पुढेही त्याच झपाट्याने काम करायचे आहे. सब का साथ, सब का विकासवर देशवासीयांनी विश्वास दाखवला आहे शिवाय, माझा देश बदलू शकतो हा विश्वास गेल्या 5 वर्षांनी लोकांना दिला असल्याचेही मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 73rd Independence day Pm narendra modi speech