
नवी दिल्ली: "कौशल्य आणि सामर्थ्याने भरलेल्या आपल्या मातीसाठी काही करण्याची इच्छा असलेल्या युवकांना तयार करण्यात शिक्षण, शिक्षण परंपरा (education culture) आणि शिक्षण व्यवस्थेची मोठा भूमिका आहे. आज देशाजवळ २१ व्या शतकाची गरज पूर्ण करणारी नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती (Education policy) आहे. आता आपली मुलं कौशल्याच्या कमतरतेमुळे थांबणार नाहीत, ना भाषेच्या (language) सीमेमध्ये बांधली जाणार" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) म्हणाले. ते ७५ व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत.
"दुर्भाग्याने आपल्या देशात भाषेवरुन विभाजन निर्माण झालय. भाषेमुळे देशातील प्रचंड टॅलेंट पिंजऱ्यात बांधलं गेलय. मातृभाषेमध्ये हुशार माणसं मिळू शकतात. मातृभाषेत शिक्षण घेतलेले लोक पुढे येतील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. गरीबाचा मुलगा, गरीबाची मुलगी मातृभाषेत शिकून प्रोफेशनल बनतील. त्यांच्या सामर्थ्याबरोबर न्याय होईल" असे मोदी म्हणाले.
"नवीन शिक्षानीती गरीबीविरोधात लढण्याचं साधन आहे, असं मी मानतो. नवीन शिक्षानीती गरीबीविरोधात एक शस्त्र बनणार आहे. देशाने बघितलय खेळाच्या मैदानात भाषा बाधा बनली नाही. त्याचा परिणाम बघतोय युवाप्रतिभा यमोर येतेय" असे मोदी म्हणाले.
"नवीन शिक्षा नीतीचं वैशिष्ट्य म्हणजे यात क्रीडा अतिरिक्त विषय नाही. क्रीडाला मुख्य अभ्यासाचा विषय बनवलाय. जीवनात खेळ असणं भरपूर आवश्यक आहे. खेळाला मुख्यधारेमध्ये समजल जातं नव्हतं. यावेळी ऑलिंपिकमध्ये आपण बघितलं. हा बदल आपल्या देशासाठी टर्निंग पॉईंट आहे. आता देशात क्रीडा क्षेत्रात टॅलेंट, टेक्नोलॉजी आणि प्रोफेशनलिजम आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दशकात या प्रयत्नांना गती देऊन अजून व्यापक करायचं आहे" असं मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.