75th Independence Day 2021: 'विभाजनाचं दु:ख आजही मनाला सलतय'

'विभाजनाचं दु:ख आजही मनाला सलतय. स्वातंत्र्यानंतर फाळणीचं दु:ख सहन करणाऱ्या लोकांना आपण लवकर विसरलो'
narendra modi
narendra modi
Updated on

नवी दिल्ली: आज ७५ वा स्वातंत्र्य दिन (75th Independence Day) असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन (red fort) देशाला संबोधित करत आहेत. आपल्या भाषणातून वेगवेगळ्या मुद्यांना स्पर्श करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 'फाळणी भयावह स्मृती दिना' (Vibhajan Vibhishika Smriti Diwas) बद्दलही बोलले. कालच मोदी सरकारने (modi govt) यापुढे दरवर्षी १४ ऑगस्ट 'फाळणी भयावह स्मृती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

"विभाजनाचं दु:ख आजही मनाला सलतय. स्वातंत्र्यानंतर फाळणीचं दु:ख सहन करणाऱ्या लोकांना आपण लवकर विसरलो. कालच आपण यापुढे दरवर्षी १४ ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मृती दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला" असं मोदी म्हणाले.

narendra modi
सर्वसमावेशक विकास झाला?

"विभाजनाच्यावेळी अमानवीय परिस्थितीचा त्यांनी सामना केला. अत्याचार सहन केले. सन्मानपूर्वक त्यांच्यावर अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत. अशा लोकांनी आपल्यामध्ये स्मृतीरुपी जिवंत रहाणं आवश्यक आहे. 'फाळणी भयावह स्मृती दिन' साजरा करण्याचं निर्णय होणं ही अशा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भारतीयांकडून श्रद्धांजली आहे" असे मोदी यांनी सांगितले.

narendra modi
बरेच मिळविलेय, पण मोठा पल्ला गाठायचाय...

ऑलिंपिकमधील पदक विजेत्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट

ऑलिंपिकमधील पदकविजेत्या खेळाडूंचं पंतप्रधान मोदींनी विशेष कौतुक केलं. त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून बोलवण्यात आले आहे. मोदींनी भाषणा दरम्यान ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करण्याचे आवाहन केले. त्यांनी फक्त अभिमानाचा क्षणच दिला नाहीय तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणाही दिलीय असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com