

Republic Day 2026 theme Vande Mataram
ESakal
दिल्लीत ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे. २६ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या या राष्ट्रीय सणासाठी लोक प्रचंड उत्साह दाखवत आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करून भारताने लोकशाही प्रजासत्ताक म्हणून आपली नवीन ओळख प्रस्थापित केली. संविधान तयार करण्याचे ऐतिहासिक काम डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी केले होते. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.