esakal | कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

बोलून बातमी शोधा

कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा
कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

हैद्राबाद : भारतात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशात सध्या लशीकरणाची मोहिम जोरदार गतीने सुरु आहे. देशात सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड आणि भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सीन या दोन लशींना मान्यता देण्यात आली आहे. गेल्या 16 जानेवारी रोजी भारतात लशीकरणाच्या मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे. त्याअतंर्गत भारतीयांचं लशीकरण सुरु आहे. तसेच भारताने या लशी निर्यात देखील केल्या आहेत. यापैकी भारत बायोटेकने आज बुधवारी म्हटलंय की, त्यांची कोव्हॅक्सीन ही लस तिसऱ्या टप्प्यातील अंतिम विश्लेषणाअंतर्गत कोविड-19 संक्रमणाच्या हलक्या, मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांपर्यंत प्रभावी आढळली आहे.

कंपनीने म्हटलंय की, तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासाचा अंतिम आकडा असं सांगतो की कोव्हॅक्सीन लस घेतल्यानंतर संक्रमित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज 100 टक्क्यापर्यंत कम होते. याचा अर्थ संक्रमित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज भासत नाही.

हेही वाचा: डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

भारत बायोटेकने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, अलिकडेच कोरोना संक्रमणाच्या वाढलेल्या प्रकरणांमध्ये 127कोविड संक्रमणाची लक्षणे असलेले रुग्ण होते ज्यांच्यात हलके, मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या संक्रमितांमध्ये ही लस 78 टक्के प्रभावी आढळून आली.तर लक्षणे नसलेल्या कोरोना संक्रमितांच्या प्रकरणांमध्ये ही लस 70 टक्के प्रभावी आढळून आली. भारत बायोटेकचे चेअरमन आणि डायरेक्टर कृष्णा इला यांनी म्हटलंय की, सार्स-कोव-2 च्या विरोधात ही लस प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे. कोव्हॅक्सिन लशीने मानवी चाचणी तसेच आपत्कालीन परिस्थितील वापरासाठी सुरक्षित असल्याची खात्री दिली होती. कोव्हॅक्सीन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासामध्ये 25,800 लोक सहभागी झाले होते ज्यांचं वय 18 ते 98 वर्षे होतं. दुसरा डोस दिल्यानंतर 14 दिवसांनंतर त्यांचं विश्लेषण केलं गेलं होतं.