

8-Year-Old Boy Attacks 6-Year-Old Girl
Esakal
अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीला ८ वर्षांच्या मुलाने वर्गात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वर्गात दगड आणि कुंडीने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. हरियाणाच्या पंचकुला इथं वर्गातच घडलेल्या या घटनेमुळे शाळेत मुलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्यावर चंडिगढ पीजीआयमध्ये उपचार केले जात आहेत.