देशात 80% प्रौढांचे कोरोना लसीकरण पूर्ण : केंद्रीय आरोग्य मंत्री | Corona Vaccination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

80 adult population fully vaccinated against Coronavirus in india says health minister

देशात 80% प्रौढांचे कोरोना लसीकरण पूर्ण : केंद्रीय आरोग्य मंत्री

जगभरात कोरोना (Corona) विरोधात लढाई लढली जात आहे, या दरम्यान देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी ट्विटरवर जाहीर केले की, भारताने आपल्या प्रौढ पात्र लोकसंख्येपैकी 80% नागरिकांनाचे संपूर्ण लसीकरण केले आहे.

त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली, त्यांनी लिहिले की, 'सर्वांसाठी लस, मोफत लस. भारताने आपल्या प्रौढ लोकसंख्येच्या 80% लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 'सबका प्रयास' या मंत्राने देश 100% लसीकरणाकडे जात आहे.'

दरम्यान शुक्रवारी सकाळी कोरोना लसीकरण पुर्ण झालेल्या नागरिकांची संख्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात एकूण लसीकरण 1,74,64,99,461 वर पोहोचली आहे. याआधी, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देखील माहिती दिली होती की 15-18 वयोगटातील एकूण दोन कोटी किशोरवयीन मुलांचे आतापर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

तरुणांच्या सहकार्याबद्दल केले कौतुक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, भारतामध्ये शुक्रवारी गेल्या 24 तासांत 25,920 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, कालच्या तुलनेत 4,837 कमी प्रकरणे आढळली आहेत, दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 42.78 मिलियन पर्यंत पोहोचला आहे. तसेच दैनंदिन 492 मृत्यूंसह मृतांची संख्या 510,905 वर पोहोचली, असे शुक्रवारी अपडेट केलेल्या डेटामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: राहुरीत माजी नगरसेविकेवर जुन्या वादातून गोळीबार; चार जण ताब्यात

देशात 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू केले . त्यानंतर सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला गेल्या वर्षी 1 मे पासून लसीकरण करण्याची परवानगी देऊन लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी 3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू झाला.

ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, भारताने 10 जानेवारीपासून आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना, निवडणूक ड्युटीवर तैनात कर्मचार्‍यांसह फ्रंटलाइन वर्कर्सना आणि 60 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना 10 जानेवारीपासून लसीचा प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरुवात केली .

हेही वाचा: Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांपेक्षा कमीत बेस्ट प्लॅन, पाहा यादी

Web Title: 80 Adult Population Fully Vaccinated Against Coronavirus In India Says Health Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..