Prepaid Recharge Plan : Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांपेक्षा कमीत बेस्ट प्लॅन, पाहा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Prepaid Plans for Jio, Airtel and VI

Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांपेक्षा कमीत बेस्ट प्लॅन, पाहा यादी

Jio, Airtel आणि Vi तिन्हींनी त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. याशिवाय, अलिकडच्या काही दिवसांत असे काही रिपोर्ट देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतातील दूरसंचार कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती आणखी वाढवू शकतात असा दावा केला जात आहे. मात्र, आजही, Jio, Airtel आणि Vi चे असे काही प्लॅन आहेत, जे तुम्हाला 200 रुपयां पेक्षा कमी किंमतीत अनेक फायदे देतात. या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, कॉलिंग तसेच काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओने भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सध्याही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये इतर दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत Jio चांगले बेनिफिट्स मिळतात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दोन प्लॅन आहेत, ज्यामध्ये 1GB डेली डेटा उपलब्ध आहे, तर एका प्लॅनमध्ये 1.5GB डेली डेटा उपलब्ध आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

जिओचा पहिला प्लॅन 149 रुपयांमध्ये येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 20 दिवसांची आहे, त्यानुसार तुम्हाला या रिचार्ज पॅकमध्ये एकूण 20GB डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभही दिला जात आहे.

यादीतील जिओचा पुढील प्लॅन 179 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 149 पॅक प्रमाणेच फायदे मिळतील, परंतु त्याची वैधता 24 दिवसांपर्यंत वाढते, त्यानुसार तुम्हाला एकूण 24GB डेटा (1GB दररोज हाय-स्पीड डेटा) मिळेल

Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी दरात 1.5GB प्रति दिन हाय-स्पीड डेटाचा पॅक देखील ऑफर करते. त्याची किंमत 119 रुपये आहे. मात्र त्याची वैधता कमी आहे. या पॅकमध्ये तुम्हाला फक्त 14 दिवसांची वैधता मिळेल. 1.5GB दैनंदिन हाय-स्पीड डेटासह, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 मोफत एसएमएस सारखे फायदे देखील आहेत.

हे वर दिलेले सर्व जिओ प्लॅन्स सोबत तुम्हाला Jio TV, Jio Cloud, Jio Cinema आणि Jio सेक्युरिटी यांचा एक्सेस दिला जातो.

हेही वाचा: दाऊदच्या 'डी-कंपनी'कडून क्रिप्टोचा वापर, ED चे साथिदारांवर छापे

एअरटेल (Airtel) प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 200 रुपयांच्या आता प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये Jio प्रमाणेच 3 पॅक आहेत, परंतु त्यापैकी कोणताही डेली हाय-स्पीड डेटा देत नाही. हे सर्व प्लॅन अशा यूजर्ससाठी आहेत ज्यांचा डेटा वापर खूपच कमी आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

एअरटेलचा पहिला प्लॅन 99 रुपयांचा आहे, जो एक स्मार्ट रिचार्ज ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 200MB एकूण हाय-स्पीड डेटा मिळेल. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळत नाहीत. तुम्हाला व्हॉइस कॉलसाठी 1 पैसे प्रति सेकंद, स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि राष्ट्रीय एसएमएससाठी 1.50 रुपये द्यावे लागतील.

पुढील प्लॅन 155 रुपयांचा आहे, ज्यामध्ये एकूण 1GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे. या दरम्यान तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि 300 मोफत एसएमएसचा लाभ दिला जात आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला Amazon Prime च्या मोबाइल एडिशनचे 30-दिवसांची फ्री ट्रायल मिळेल आणि तुम्हाला मोफत Hello Tunes आणि Airtel Wync Music वर देखील एक्सेस दिला जात आहे.

यादीतील पुढील प्लॅन 179 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 2GB हाय-स्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 मोफत एसएमएस फायदेही मिळतील. 155 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.

हेही वाचा: राहुरीत माजी नगरसेविकेवर जुन्या वादातून गोळीबार; चार जण ताब्यात

व्ही (Vi) प्रीपेड रिचार्ज प्लॅन

Vi च्या पोर्टफोलिओमध्ये 200 रुपयांच्या खाली चार रिचार्ज प्लॅन आहेत . यापैकी पहिला प्लॅन 149 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 1GB हाय-स्पीड डेटा मिळेल. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध आहे आणि त्याची वैधता 21 दिवस आहे. मात्र, या प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.

पुढील प्लॅन फक्त 6 रुपयांनी महाग आहे, म्हणजेच 155 रुपये, ज्यामध्ये 1GB एकूण हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. हा 24 दिवसांच्या वैधतेसह एकूण 300 फ्री एसएमएस देखील ऑफर करतो.

पुढील प्लॅन 179 रुपयांचा आहे, जो एकूण हाय-स्पीड डेटा 2GB ऑफर करतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 300 फ्री एसएमएसही उपलब्ध आहेत. त्याची वैधता 28 दिवस आहे आणि प्लॅन Vi Movies आणि TV वर फ्री एक्सेस देखील देतो.

यादीतील Vi चा शेवटचा प्लॅन 199 रुपयांचा आहे. 200 रुपयांच्या आत Vi ​​चा हा एकमेव प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि 1GB डेली हाय-स्पीड डेटासह अमर्यादित कॉलिंग फायदे मिळतात. मात्र त्याची वैधता 18 दिवस आहे.

हेही वाचा: रेडमीचा रेकॉर्ड ब्रेकिंग सेल! फक्त 1 मिनिटात विकले 330 कोटींचे फोन

Web Title: Jio Airtel Vi Prepaid Recharge Plans Under 200 Rupee With Unlimited Data Calling And Other Benefits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyPrepaid Plan
go to top