निवडणुकीपूर्वी सापडले तब्बल 80 बॉम्ब; परिसरात उडाली खळबळ, कोणाला मारण्याचा होता कट? Panchayat Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal Panchayat Election

शनिवारी रात्री पोलिसांनी सदायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात छापेमारी केली.

Panchayat Election : निवडणुकीपूर्वी सापडले तब्बल 80 बॉम्ब; परिसरात उडाली खळबळ, कोणाला मारण्याचा होता कट?

बीरभूम : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी (West Bengal Panchayat Election) बीरभूम जिल्ह्यात (Birbhum District) स्फोटकं आणि बॉम्ब (Bomb) मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आता एकाच वेळी 80 बॉम्ब मिळाल्यामुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये. हे बॉम्ब ड्रममध्ये भरून ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री पोलिसांनी सदायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात छापेमारी केली.

रात्रीच्या या कारवाईत 5 ड्रम बॉम्ब सापडले. या ड्रममध्ये ठेवलेले एकूण 80 बॉम्ब सीआयडीच्या बॉम्बशोधक पथकानं (CID Squad) रविवारी सकाळी निकामी केले. एका दिवसात 80 बॉम्ब मिळाल्यामुळं जिल्हा पोलिसही चक्रावले आहेत.

जिल्हाभर पोलिसांचा रूट मार्च

4 फेब्रुवारीला माडग्राममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तृणमूलचे दोन कार्यकर्ते ठार झाले होते. यानंतर बीरभूमचे एसपी नागेंद्र नाथ त्रिपाठी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी जिल्ह्यातील भास्कर मुखर्जी यांना बीरभूमचे पोलीस अधीक्षक करण्यात आलं. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हाभर पोलिसांचा रूट मार्च सुरू केलाय.

West Bengal Panchayat Election

West Bengal Panchayat Election

पोलीस अलर्ट मोडवर..

दरम्यान, जुन्या गुन्हेगारांची धरपकडही तीव्र करण्यात आलीये. यासोबतच अवैध बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांचाही शोध सुरू आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी व गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च आणि सर्च ऑपरेशन राबवलं जात असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितलं.

शोध मोहीम तीव्र

पोलिसांनी जिल्ह्यात शोधमोहीम तीव्र केलीये. शनिवारी रात्री झडतीदरम्यान पोलिसांनी सदायपूर पोलीस ठाण्याच्या पाच भागांतून किमान 80 बॉम्ब जप्त केले. हे बॉम्ब कोणी पेरले आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.