esakal | ब्रह्मपुत्रा नदीतील बोट दुर्घटनेतील ८४ जणांना वाचविले
sakal

बोलून बातमी शोधा

river

ब्रह्मपुत्रा नदीतील बोट दुर्घटनेतील ८४ जणांना वाचविले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जोरहाट/गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील ८७ पैकी ८४ जणांचा बचाव करण्यात यश आले आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

आसाममधील जोरहाट जिल्ह्यात निमती घाटाजवळ हा अपघात काल सायंकाळी घडला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ‘माँ कमला’ ही खासगी बोट माजुली येथे जात होती. त्याचवेळी माजुलीहून येणाऱ्या ‘त्रिपकाई’ या सरकारी फेरीबोटीशी तिची निमती घाट येथे धडक बसली. धडकेनंतर ‘माँ कमला’ बोट पाण्यात उलटून बुडाली.

हेही वाचा: पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

बोटीवर १२० हून अधिक लोक होते. शोधमोहिमेदरम्यान एका महिलेचा मृतदेह सापडला. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर उलटलेल्या बोटीचे अवशेष राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) पाणबुड्यांना सापडले. या बोटीचा तळ कापला गेलेला होता. पण बोटीत एकही प्रवासी आढळला नाही, अशी माहिती जोरहाटचे उपायुक्त अशोक बरमन यांनी दिली. ‘‘बोट दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. जोरहाट आणि माजुली जिल्ह्यांमधील ८४ जणांचा बचाव केला आहे,’’ असे ते म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. या प्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला.

loading image
go to top