esakal | पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गणेशोत्सव कालावधीत शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र समाजमध्यमांवर संचारबंदी लागू असल्याचे दिशाभूल करणारे काही संदेश फिरत आहेत.

पुण्यात संचारबंदी नाही, जमावबंदी लागू; वाचा काय आहे आदेश?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव कालावधीत शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र समाजमध्यमांवर संचारबंदी लागू असल्याचे दिशाभूल करणारे काही संदेश फिरत आहेत. शहरात असे कोणत्याही प्रकारचे नव्याने आदेश लागू करण्यात आले नसल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४४ नुसारचे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार उत्सव कालावधीत कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक ठिकाणी, मंडळासमोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, गॅस, पेट्रोल) पदार्थाच्या साह्याने आगीचे लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहे.

हेही वाचा: "मंडळांनो, यंदा गणेशोत्सवात गर्दी टाळा"

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार आदेश लागू करण्यात आले आहेत. कलम १४४ नुसार ज्वालाग्रही पदार्थाच्या बाबतीत लागू केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून शहरात पूर्णताः उत्सव कालावधीत संचारबंदीचा लागू असल्याचे संदेश व्हायरल झाले आहेत. मात्र वेगळे कोणते निर्बंध पुण्यात लागू नाहीत.

‘श्री’च्या दर्शनाची सोय ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर बाहेर येण्याचे कारण नाही. तसेच यंदा विसर्जन मिरवणुकांवरदेखील बंदी आहे. गणेश मंडळांनी आचारसंहितेनुसार उत्सव साजरा करण्यास तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

loading image
go to top