esakal | घरात काम नको रे बाबा; 85 टक्के कर्मचारी म्हणतायेत ऑफिसला जायचंय
sakal

बोलून बातमी शोधा

Work from home

कोरोनामुळे अचानक कामाच्या स्वरुपात बदल करावा लागला. वर्क फ्रॉम होम करणं अनेकांसाठी नवा अनुभव होता. ६४ टक्के लोकांनी कधीही वर्क फ्रॉम होम केलं नव्हतं.

घरात काम नको रे बाबा; 85 टक्के कर्मचारी म्हणतायेत ऑफिसला जायचंय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घालण्यास सुरवात केल्यापासून अनेकांनी वर्क फ्रॉम होमवर भर दिला. अनेक आयटी कंपन्यांसह इतर कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास मुभा दिली. भारतात कोरोना महामारीचा उद्रेक होण्याआधीच मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गोष्टीला एक वर्ष उलटून गेलं आहे. आणि आता वर्क फ्रॉम होमला लोक कंटाळले आहेत. जवळपास ८५ टक्के नागरिक ऑफिसला परतण्यासाठी आतुर झाले आहेत, असे एका सर्व्हेतून दिसून आले. (85 percent of employees want to return to workplaces but with home-office flexibility)

वर्कप्लेस डिझाइन कंसल्टन्सी कंपनी असलेल्या स्पेस मॅट्रिक्सने ऑफिसला जाणाऱ्या एक हजार लोकांचा एक सर्व्हे केला. 'द वे वी वर्क' सर्व्हेनुसार ८५ टक्के लोक आठवड्यातून २-३ दिवस ऑफिसला जाणे पसंत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काहीजण त्यांच्या ऑफिसला खूप मिस करत आहेत, असेही दिसून आले. कोरोनामुळे अचानक कामाच्या स्वरुपात बदल करावा लागला. वर्क फ्रॉम होम करणं अनेकांसाठी नवा अनुभव होता. ६४ टक्के लोकांनी कधीही वर्क फ्रॉम होम केलं नव्हतं. तर अनेकांना वर्क फ्रॉम होम मिळाल्याने आनंदही झाला होता. मात्र काम करताना अनेक तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागला, असेही त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: देशातील 70 टक्के हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर

सर्व्हेतून असे दिसून आले की, ३३ टक्के लोकांना असे वाटते की, वर्क फ्रॉम होममुळे त्यांची उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) कमी झाली. कारण त्यांच्याकडे योग्य संसाधने नव्हती. त्यामुळे त्यांना काम करताना अनेकदा विचलित व्हावं लागलं. तर ३० टक्के जणांना असं वाटतं की, ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत योग्य प्रकारे संवाद होत नसल्यानेही ते मिळूनमिसळून काम करू शकत नाहीत. तर ३० टक्के जणांनी वर्क फ्रॉम होममुळे त्यांच्या कामाच्या वेळेत वाढ झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Video : लाडू विक्रेत्याचा गोविंदाच्या गाण्यावर धडाकेबाज डान्स

लोक त्यांचे ऑफिस खूप मिस करत आहेत, हे सर्व्हेतून दिसून आले. टीम मीटिंग आणि ब्रेन स्टॉर्मिंगसाठी ५० टक्के लोक ऑफिसला जाणे पसंत करतात. २० टक्के लोक क्लायंटसोबतची मीटिंग आणि २० टक्के लोक सोशल इंटरॅक्शनसाठी ऑफिसला जाणे पसंत करतात. ४३ टक्के जणांचे असे म्हणणे आहे की ते समोरासमोर संवाद साधणे मिस करत आहेत. तर कामावर लक्ष लागावे म्हणून ३७ टक्के जणांना ऑफिसची आठवण येत आहे.

वर्क फ्रॉम होम करणारे जगात सर्वाधिक ४३ टक्के लोक हे दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील नागरिक आहेत. भारत आणि चीनमध्ये हे प्रमाण २९ टक्के आहे. सर्वांसोबत काम केल्याने व्यक्तीच्या उत्पादकतेमध्ये ५९ टक्के फरक पडतो, असेही सर्व्हेतून दिसून आले.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.