esakal | Video : लाडू विक्रेत्याचा गोविंदाच्या गाण्यावर धडाकेबाज डान्स
sakal

बोलून बातमी शोधा

Video : लाडू विक्रेत्याचा गोविंदाच्या गाण्यावर धडाकेबाज डान्स

Video : लाडू विक्रेत्याचा गोविंदाच्या गाण्यावर धडाकेबाज डान्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सोशल मीडियावर (social media) दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते आणि हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडीओमधून (viral video) अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात येतात. मध्यंतरी असेच प्रकाशझोतात आलेले डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव साऱ्यांच्याच लक्षात असतील. गोविंदाच्या गाण्यावर सहज ठेका धरणाऱ्या या काकांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या नंतर आता अशाच एका दुकानदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा दुकानदारदेखील अभिनेता गोविंदाचा जबरा फॅन असून त्याच्या गाण्यावर त्याने धमाकेदार ठेका धरला आहे. (video-ladduwala-jabra-dance-on-govindas-song-people-says-actors-fail)

हेही वाचा: चुकूनही पतीला सांगू नका 'या' पाच गोष्टी

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लाडू विक्रेत्याचा असून आनंदाच्या भरात तो चक्क रस्त्यावरच नाचू लागला आहे. विशेष म्हणजे त्याने ठेका धरलेलं गाणं नेटकऱ्यांनाही प्रचंड भावलं आहे. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या सातों जनम तुझको पाते...या तुफान लोकप्रिय गाण्यावर हा विक्रेता डान्स करत आहे.

दरम्यान, हा डान्स करत असतांना या तरुणाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली अगदी गोविंदासारखी भासत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत हा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला आहे.