esakal | विषारी दारु प्यायल्याने आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol.jpg

पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या 86 झाली आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दोन डीएसपी आणि 4 एसएचओ यांच्या अन्य सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

विषारी दारु प्यायल्याने आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चंदीगड- पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या 86 झाली आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दोन डीएसपी आणि 4 एसएचओ यांच्या अन्य सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शिवाय या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच विषारी दारु पिऊन मेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. पंजाब पोलिसांनी शनिवारी 100 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली असून 17 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार?

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची पहिली पाच प्रकरणे 29 जूलै रोजी अमृतसरमधील तारसिक्काच्या तांगडा आणि मुच्छल या गावांमध्ये समोर आली. तेव्हापासून मृतांची संख्या वाढत गेली आहे. विषारी दारू पिल्याने सर्वात अधिक मृत्यू तरणतारण येथे झाले आहेत. येथे मरणाऱ्यांची एकूण संख्या 42 झाली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिराऱ्याने सांगितले की, पीडितांचे कुटुंबीय  जबाव नोंदवण्यासाठी पुढे येत नव्हते. तसेच कोणतीही कारवाई करु इच्छित नव्हते, पण नंतर ते तयार झाले आहेत. 

गुरुदासपुरचे उपायुक्त मोहम्मद इश्फाक यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, काही परिवार त्यांच्या सदस्याचा मृत्यू विषारीदारु पिल्याने झाल्याचं मानायला तयार नाहीत. त्यांच्या परिवाराच्या सदस्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे काहींच्या शवविच्छेदनासाठी अडचणी येत आहेत.

कोरोनाने हज यात्रेचं चित्रच बदलून टाकलं, पाहा PHOTO

पंजाबचे पोलिस महासंचालक(डीजीपी) दिनकर गुप्ता यांनी दिलेल्ला माहितीनुसार, पहिली पाच प्रकरणे 29 जूलै रोजी रात्री अमृतसरच्या तांगडा आणि मुच्छल या गावांमध्ये समोर आली होती. याशिवाय अमृतसर येथे 11 आणि गुरदासपुरमधील बटाला येथे बुधवारी रात्री 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमृतसरचे एसएसपी (ग्रामीण) विक्रमजीत सिंह दुग्गल यांनी सांगितलं की, तारसिक्का पोलिस प्रभारी विक्रमजीत सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे.

विषाणू दारु पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याने पंजाबमधील राजकीय वातावरणही तापलं आहे. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेता आणि आमदार अमन अरोडा यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागितला आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलनेही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या प्रकरणाच्या चौकशीची करण्याची मागणी केली आहे. 

(edited by-kartik pujari)