
8th Pay Commission Announcement
esakal
Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या दिवाळीला खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार यावेळी आठव्या वेतन आयोगाशी संबंधित मोठा निर्णय घेऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार चालू ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोग गठन होऊ शकतो. मागच्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात नुसत्या चर्चा सुरु आहेत. वास्तविक आयोगाला अभ्यास करायला, शिफारशी स्वीकारायला आणि प्रत्यक्ष सरकारने निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो. मात्र यावेळी या सगळ्या प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीने होण्याची शक्यता आहे.