8th pay commission: आठव्या वेतन आयोगात मोठे बदल; सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत होणार वेगळा निर्णय?
8th Pay Commission to bring major changes to CGHS health benefits: जानेवारी २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली असली तरी, अजूनही 'टर्म ऑफ रेफरेंस' (ToR) निश्चित झालेले नाहीत, तसेच आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांची नियुक्तीही झालेली नाही.
नवी दिल्ली: केंद्र सरकार आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (CGHS) मध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. या योजनेऐवजी एक नवी विमा आधारित आरोग्य योजना आणण्यावर विचार सुरू आहे.