
Government Employee: सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाची उत्सुकता आहे. एकदा आयोगाचे सदस्य निश्चित झाले आणि कामकाज सुरु झालं की, लगेच आपल्या शिफारशी मांडण्यासाठी संघटना तयार आहेत. मात्र हे वेटिंग लांबू शकतं, असं काहींचं म्हणणं आहे. एका रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोग गठीत झाल्यानंतर आपल्या शिफरशी तयार करणं आणि ते सरकारला सुपूर्द करणं; यासाठी आठरा महिन्यांचा वेळ लागू शकतो.