esakal | दारु मिळाली नाही म्हणून पिलं सॅनिटायझर; 9 लोकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

sanitizer.jpg

आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारु मिळत नसल्याने काही लोकांनी सँनिटायझर प्राशन केले आहे.

दारु मिळाली नाही म्हणून पिलं सॅनिटायझर; 9 लोकांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद- आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारु मिळत नसल्याने काही लोकांनी सँनिटायझर प्राशन केले आहे. यात कमीतकमी 9 लोकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. प्रकाशम जिल्ह्यातील कुरीचेडू येथे ही घटना घडली आहे. बुधवारी उशीरा एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर गुरुवारी दोन आणि शुक्रवारी सहा जणांचा मृत्यू झाला.

आता गुगल अन् फेसबुकला मोठी किंमत मोजावी लागणार

गेल्या दोन दिवसात जवळजवळ 20 लोकांनी सॅनिटायझर पिल्याचं कळत आहे. या सर्वांना दारु पिण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात टाळेबंदी करण्यात आल्याने दारु मिळणे बंद झाले आहे. अशात काही व्यक्तींनी सॅनिटायझर प्राशन केले. ज्यात आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन लोक भिकारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि उर्वरीत स्थानिक झुग्गीवासी आहेत. 

अनुगोंडा श्रीनू(25), भोगेम तिरुपतैया (35), गुंटका रामी रेड्डी (60), कदियम रामानैया (28), राजा रेड्डी (65), रामानैया (65), बाबू (40), चार्ल्स (45), ऑगस्टीन (45) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अन्य व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दारु मिळत नसल्याने या लोकांनी सॅनिटायझर प्राशन केले आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे कुरिचेदु येथे कडकडीत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात काही दिवसांपासून दारु विक्री होत नाही. अशात दारुचे व्यसन असणाऱ्या काही लोकांनी सॅनिटायझर पिल्याची माहिती प्रकाशम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक(एसपी) सिद्धार्थ कोशल यांनी दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS 

बुधवारी स्थानिक देवी दुर्गा मंदिर येथील एका भिकाऱ्याच्या पोटात गंभीर दुखू लागले होते. बुधवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी पोटात त्रास सुरु होऊन दोघांचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. चाचणीसाठी परिसरातील दुकानातील सर्व सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहेत. शिवाय लोकांनी केवळ सॅनिटायझर पिले आहे की दारुमध्ये मिसळून ते पिले आहे याबाबत पोलिस शोध घेत आहेत. 

कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कुरिचेदु आणि परिसरात दहा दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दारुची सर्व दुकाने बंद आहेत. पीडित व्यक्तींच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, सॅनिटायझरचे प्राशन केल्यानंतर ते बेशुद्ध होऊन पडू लागले. त्यांनी किती प्रमाणात सॅनिटायझर पिले होते याची माहिती नाही. 

(edited by-kartik pujari)

loading image
go to top