धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes study
धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study

धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study

मधुमेह आणि बिघडलेल्या ग्लुकोजचा स्तर प्रौढामध्ये अधिक आढळतो. भारतात जागरूकता, उपचार आणि नियंत्रणाची पातळी आजही कमी आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स (ICMR-NCDIR), बंगळुरूच्या संशोधकांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: Viral : आईच्या हातचा पदार्थ बनतो 'दगड'! मुलाचा निबंध होतोय व्हायरल

फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १४ मार्च रोजी एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात भारतातील मधुमेहाविषयी सर्वसमावेशक चित्र मांडले आहे. 'डायबेटिस केअर कॅस्केड इन इंडिया' या शोधनिबंधात देशातील लोकांमध्ये मधुमेहाबाबत होत असलेल्या जागरुकतेबाबत माहिती आणि पुरावे देण्यात आले आहेत.

भारतातील लोकं मधुमेहाविषयी किती जागरूक आहेत, ते या सर्वेक्षणात सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये उपलब्ध असलेल्या मधुमेहाचा प्रसार, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केलेल्या उपाययोजना आगामी काळात अपुऱ्या ठरू शकतात.

हेही वाचा: काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!

सर्वेक्षणात लोकांची ओळख पटवून लक्ष देण्याची मागणी

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहाय्याने ICMR-NCDIR च्या नेतृत्वाखालील हे काम करते आहे. राष्ट्रीय NCD सर्वेक्षणने मधुमेहाच्या काळजीसंदर्भात त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, मधुमेहापासून वंचित असलेल्या लोकसंख्येच्या गटांची ओळख आणि निरीक्षण करण्यासाठी प्रयत्न करते आहे. २०२५ पर्यंत मधुमेह रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी केलेला हा मोठा प्रयत्न आहे. या अंतर्गत २०१७-१८ साली देशभरात १८ ते ६९ वयोगटातील ९,७२१ प्रौढांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

हेही वाचा: सकाळी Blood Sugar Lavel किती असावी? जाणून घ्या

महिला आणि शहरातील लोकांची संख्या जास्त

सर्वेक्षणानुसार, महिला आणि शहरातील प्रौढांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आढळले. सर्वेक्षणात, वृद्धत्व, लठ्ठपणा, वाढलेला रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानलीगेली. सर्वेक्षणानुसार, भारतातील ९.३% प्रौढांना मधुमेह आहे. त्यापैकी, ४५.८ टक्के लोकांना त्यांच्या मधुमेहाविषयी माहिती होती, ३६.१ टक्के लोकं उपचार घेत होते आणि १५.७ टक्के लोकांचे त्याच्या मधुमेहावर नियंत्रण होते.

हेही वाचा: Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

ग्रामीण भागातील स्थिती चिंताजनक

मधुमेहाचा प्रसार ग्रामीण भागाच्या( ६.९ टक्के) तुलनेत शहरात (१४.३ टक्के) दुप्पट प्रमाणात आहे. याविषयी ICMR-NCDIR चे संचालक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. प्रशांत माथूर म्हणाले की, शहरातील प्रौढांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरूकता आणि उपचाराच्या माहितीचा अभाव असल्याने स्थिती चिंताजनक आहे.

सर्व्हेत पुरूषांच्या (८.५ टक्के) तुलनेत महिलांना (१०.२ टक्के) मधुमेह होण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून आले. पण त्यातल्या ६.० टक्के महिलांना नुकतीच मधुमेहाची लागण झाली होती. तसेच वाढते कोलेस्ट्रॉल असलेल्या ४४.२ टक्के लोक आणि उच्च रक्तदाब असलेल्या १६.३ टक्के लोकांना मधुमेह होता, असेही आढळले.

Web Title: 9 Percent Of Adults In India Suffer From Diabetes Icmr And Ncdir Study Reveals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..