काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!|Holi Weird Tradition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Weird Tradition
काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!|Holi Weird Tradition

काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!

Holi Weird Tradition: होळी खेळण्याचा उत्साह आता सगळीकडे दिसून येतो आहे. दोन दिवसांवर आलेली होळी खेळण्यासाठी लोकांनी तयारी सुरू केली आहे. आपल्या देशात होळीच्या विविध परंपरा बघायला मिळतात. महाराष्ट्रातल्या एका गावात तर होळीच्या दिवशी चक्क जावयाला गाढवावर बसवून गावभर फिरवले जाते, हे वाचून अनेकांना धक्का बसला असेल. पण ही परंपरा खरी आहे.

हेही वाचा: गेल्या १५० वर्षांपासून या गावांत साजरी झाली नाही होळी! धक्कादायक कारण जाणून घ्या

अशी आहे परंपरा- ही परंपरा महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील आहे. होळीचे दोन दिवस ही प्रथा पाळली जाते. आधी जावयला रंग लावतात. त्यानंतर सर्वजण मिळून त्याला गाढवावर बसवून पुर्ण गावात फिरवतात. हे असं लोकं का करत असावेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामागे असलेले कारणही मजेशीर आहे. गावातील लोकांनी सांगितल्यानुसार, सुमारे ८० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील येवता गावात राहणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या जावयाने होळीचा रंग लावण्यास नकार दिला होता. यानंतर लोकांनी ठरवले कि त्याच्यासोबत होळी खेळायची पण वेगळ्या पद्धतीने. त्या व्यक्तीच्या सासऱ्यांनी गाढव बोलावून, सजवून गावात फिरवले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. होळीच्या दिवशी जावयाला रंग लावावा म्हणून हा प्रकार केला जातो.

हेही वाचा: Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा

फिरून आल्यावर कोडकौतुक- जेव्हा जावई गाढवावर बसून गावभर फिरल्यानंतर त्याचा जोरदार पाहुणचार केला जातो. जावयाला मिठाई-गोडधोड खायला दिले जाते. त्याला आवडीचे कपडेही घेतले जातात. काहीवेळा तर गाढवावरून उतरल्यावर सासरे जावयाला सोन्याची अंगठी देतात.आता या गावात ही प्रथा बनली असून लोक ती आवडीने पाळतात. काही जावई तर घाबरून पळून जातात. पण लोकं त्यांना पळून जायची संधी न देता गाढवावर बसवतात.

हेही वाचा: Holi 2022 : होळी खेळताना जपा डोळे! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

Web Title: People Ride The Son In Law On Donkey In Maharashtra Village On Holi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..