लग्नानंतर ८ वर्षांनी झालेली मुलगी, आईने करिअरही सोडलं; ९ वर्षीय मुलीचा अचानक वर्गातच मृत्यू, VIDEO VIRAL

9-Year-Old Girl Death वर्गात असतानाच 9 वर्षीय मुलगी अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तिच्या कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
9-Year-Old Girl Death

9-Year-Old Girl Death

Esakal

Updated on: 

दिल्लीतल्या एका खासगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज-२ परिसरात बुधवारी ही घटना घडली. वर्गात असतानाच मुलगी अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Loading content, please wait...