
एक दोन नव्हे तर ७० वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. ८ मुलांना जन्म दिला. नातवंडंही झाली. आता आयुष्याच्या संध्याकाळी वयाच्या नव्वदीत दाम्पत्यानं लग्न केलंय. राजस्थानच्या डुंगरपूरमधली ही घटना असून सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. ९५ वर्षांचे रामा भाई अंगारी आणि ९० वर्षांच्या जीवली देवी यांनी ७० वर्षे लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहून एकमेकांची साथ दिली. आता नातवडं, परतवंडांच्या साक्षीनं त्यांनी लग्न केलं.