अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

अयोध्येत बाल कल्याण संस्थेने बसमधून नेत असणाऱ्या ९५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये अशी अनेक मुले आहेत ज्यांना पालक नाहीत. या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठा घोटाळा आणि फसवणूक झाल्याचे बाल कल्याण समितीचे म्हणणे आहे.
95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya
95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya Esakal

बिहारमधील अररिया येथून बाल कल्याण समितीने बसमधून नेत असणाऱ्या 93 मुलांची सुटका केली आहे, त्या मुलांचे वय 5 ते 9 वर्षे आहे, या मुलांना अयोध्येतील सहारनपूर येथे नेण्यात येत होते. अयोध्येतील देवकाली चौकाजवळ बसमधून बालकल्याण समितीच्या लोकांनी या लहान बालकांची सुटका केली आहे.

जनावरासारखी मुलं एका बसमध्ये भरलेली होती. ही मुले गरीब कुटुंबातील आहेत. यामधील काही मुलांना आई-वडील नाहीत. यातील अनेक मुलांची आधारकार्डे देखील बनावट असू शकतात, असे बालकल्याण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. यामागे मोठा हात असण्याची शक्यता आहे.

95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya
UP Yogi: 'काँग्रेस बेशरम, मुस्लिमांना गोमांस खाण्याचा अधिकार देऊ पाहत आहे'; योगी आदित्यनाथ यांचा गंभीर आरोप

आता सापडलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे बाल कल्याण समिती सदस्या सुनीता यादव यांनी सांगितले. मुले एकमेकांचे भाऊ आहेत की, एकाच भागातील आहेत किंवा वस्तीतील आहेत हे त्यांना माहीत नाही. ते चुकीचा पत्ता सांगत असल्याचेही समोर आले आहे. आधार कार्ड तपासले असता त्यांना आपल्या जिल्ह्याचे नावही सांगता आले नाही. ही मुले मदरशात नेली जात होती. आपण कुठे जात आहोत याची मुलांना कल्पना नव्हती.

95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya
Nainital Forest fire: नैनितालच्या जंगलात भीषण वणवा; निवासी भाग धोक्यात, लष्कराला पाचारण...काय आहे परिस्थिती?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मौलवीचा फोन आला त्यानी सांगितले होते म्हणून आईने पाठवले असे काही मुलांचे म्हणणे आहे. मौलवी काही मुलांना त्यांच्या घरातून घेऊन आला होता. त्याना घरातून उचलून, बसमध्ये बसवले, तर काही मुलांच्या घरी त्यांनी मुलांना पाठवायला सांगितले, म्हणून पाठवण्यात आले होते. मुलांना कुठे नेण्यात येत आहे याची माहीत आहे का, असे विचारले, तर त्यांनी सांगितले की, त्यांना काहीच माहिती नाही, मौलवीने फोन केला होता, त्यानंतर आईने पाठवले.

95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya
Nainital Forest fire: नैनितालच्या जंगलात भीषण वणवा; निवासी भाग धोक्यात, लष्कराला पाचारण...काय आहे परिस्थिती?

मुलांना त्यांच्या घराचा पत्ता देखील माहिती नसल्याची माहिती आहे. मूल वेगळा पत्ता सांगत आहेत तर त्यांच्या आधार कार्डावर वेगळाच पत्ता लिहलेला आहे. मुलांना मदरशाचे नावही माहीत नाही. आधार कार्डही बनावट बनवले असण्याची शक्यता आहे. समुपदेशन करताना मुलांना त्यांचा पत्ताही सांगता येत नाही. जो व्यक्ती मुलांना घेऊन जात होता, ती मुले आमच्यासोबत असल्याचे सांगत आहे. तर मुलांना विचारले असता त्यांनी त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले.

बालकल्याण समितीचे अध्यक्ष काय म्हणाले?

बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले की, बिहारमधील अररिया येथून सहारनपूरला बेकायदेशीरपणे मुलांना आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर तातडीने कारवाई करत आम्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पकडलेल्या लोकांना या मुलांच्या पालकांचे कोणतेही वितरण पत्र मिळालेले नाही. यामध्ये पालक नसलेल्या अनेक मुलांचाही समावेश आहे. मुलांना सध्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. उर्वरित कारवाई सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com