esakal | Fight with Corona : ९५ वर्षीय आजीने दिली पेन्शन; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक!
sakal

बोलून बातमी शोधा

Mizo-Grandma

आपली पेन्शनच दान करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः आपल्या हाताने ३० मास्क शिवले असून ते गरजूंना देण्यात आले.

Fight with Corona : ९५ वर्षीय आजीने दिली पेन्शन; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ऐजॉल (मिझोराम) : संपूर्ण जग कोरोना विषाणूंचा सामना करत असून सर्वजण आपापल्यापरिने योगदान देत आहेत. यात आता एका ९५ वर्षीय आजींनी आपली एक महिन्याचे निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. तसेच स्वतः शिवलेले ३० ‘मास्क’ गरजूंना देत कोरोना विषाणूंच्या विरोधातील लढ्यात योगदान दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाघाक्लिआनी असे या आजींचे नाव असून त्या माजी आमदार लालरिंलियाना यांच्या पत्नी आहेत. देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाविरोधात लढा देत असलेल्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती, याबद्दल त्या सातत्याने आपल्याशी चर्चा करता होत्या अशी माहिती त्यांच्या सुनेनी पत्रकारांना दिली.

- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; खासदारांपाठोपाठ आमदारांच्या वेतनातही ३० टक्के कपात!

याविषयी माहिती देताना त्यांच्या सुनेने सांगितले की, नाघाक्लिआनी यांनी अखेरीस आपली एक महिन्यांचे निवृत्तीवेतन १४ हजार ५०० रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. तसेच केवळ आपली पेन्शनच दान करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः आपल्या हाताने ३० मास्क शिवले असून ते गरजूंना देण्यात आले.

- हा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर

दरम्यान, मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी नाघाक्लिआनी यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

- वर्क फ्रॉम होमचा मंत्र ठरतोय सक्सेसफुल! ७४ टक्के सीएफओंचे मत 

loading image
go to top