ECI_Voter Registration
ECI_Voter Registration

Register Voters: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा बदल दिसणार? 2 कोटी नवे मतदार ठरवणार भवितव्य

केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेसाठी मतदार नोंदणीची आकडेवारी जाहीर केली आहे.
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सुमारे ९७ टक्के मतदार हे पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर २ कोटी तरुणांनी पहिल्यांदाच मतदार नोंदणी केली आहे. हे नवमतदारच निवडणुकीत मोठा बदल घडवून आणू शकतात. (97 crore people registered to vote for forthcoming general elections in india says eci)

निवडणूक आयोगानं नुकतेच नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 96.88 कोटी मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. म्हणजे यंदाच्या निवडणुकीत १८ पासून पुढील वयाचे सुमारे ९७ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते २९ या वयोगटातील २ कोटींहून अधिक नवीन मतदार आहेत. (Latest Marathi News)

ECI_Voter Registration
Share Market Closing: शेअर बाजार किंचीत वाढीसह बंद; सेन्सेक्स 71,600 अंकांवर, कोणते शेअर्स चमकले?

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढे पात्र मतदार होते त्यात ६ टक्के मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये १८ ते २९ वयोगटातील जे नव मतदार आहेत, त्यांचं मतदान हे महत्वाचं मानलं जात आहे. कारण त्यांच्या मतदानामुळं लोकसभेतील चित्र वेगळं दिसू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com