Marathi Literature : संमेलनात ७० प्रकाशकांचा सहभाग; पुस्तकांच्या विक्रीसाठी १०६ स्टॉल, उद्यापासून सारस्वतांचा मेळा
Marathi Literature 2025 : दिल्लीमध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ७० पेक्षा अधिक प्रकाशक आणि १०६ स्टॉल्स असतील. यामुळे दिल्लीमध्ये मराठी साहित्याचा गजर होईल.
नवी दिल्ली : सरहद संस्थेच्या वतीने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनात ७० हून अधिक नामांकित प्रकाशक संस्था सहभागी होत आहे.